उत्तराखंडमध्ये बाबा तरसेम सिंह यांची हत्या करणारा पोलीस चकमकीत ठार !

हरिद्वार (उत्तराखंड) – राज्यातील उधमसिंह नगरमधील नानकमट्टा गुरुद्वाराचे कारसेवा प्रमुख बाबा तरसेम सिंह यांच्या हत्येचा आरोपी अमरजीत सिंह हा येथे झालेल्या चकमकीत ठार झाला. या हत्येतील दुसरा आरोपी सरबजीत सिंह अद्याप पसार आहे. या दोघांनी मिळून  बाबा तरसेम यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. बाबा तरसेम सिंह यांच्या हत्येप्रकरणी ३ आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

सौजन्य DNAIndiaNews