हिमाचल प्रदेशात ईदच्या दिवशी मुसलमान महिलांसाठी बस प्रवास विनामूल्य !

शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेश परिवहन महामंडळाने ईदच्या निमित्ताने मुसलमान महिलांसाठी ईद आणि बकरीद या दिवशी बससेवा विनामूल्य असल्याची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश रस्ते वाहतूक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहनचंद ठाकूर यांनी हा आदेश प्रसारित केला आहे.

११ एप्रिल या दिवशी मुसलमान महिलांना ही सुविधा मिळणार आहे. या सुविधेचा  लाभ घेण्यासाठी मुसलमान महिलांना ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. विशेष म्हणजे राज्यात प्रथमच धर्माच्या नावावर अशा प्रकारची सुविधा देण्यात येत आहे. यापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व महिलांना अशी सुविधा देण्यात आली होती. तेव्हा त्यात धर्माचे बंधन नव्हते.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या सणांच्या वेळी कधी हिंदु महिलांना अशी सुविधा का देण्यात येत नाही ? पाकिस्तानातच नव्हे, तर कुठल्याच इस्लामी देशात अशा प्रकारची सुविधा दिली जात नाही; मात्र भारतात जेथे काँग्रेसचे सरकार आहे, तेथे मुसलमानांना त्यांच्या धर्माचे आधारे विविधा सुविधा पुरवल्या जातात, हे लक्षात घ्या !