प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला जाणार !

त्या ठिकाणी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला जाणार आहे. ‘ऑडिओ व्हिज्युअल’, संग्रहालय, ध्वनीक्षेपक यंत्रणा, प्रेक्षक गॅलरी यांद्वारे महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास दाखवला जाणार आहे.

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे अव्वल !

३ मार्चला झालेल्या लोक अदालतमध्ये १ लाख ४० सहस्र ९०४ दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यामध्ये ३६९ कोटी ७८ लाख २० सहस्र २६८ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

पुणे शहरातील अधिकृत पशूवधगृहे त्वरित बंद करावीत !- मिलिंद एकबोटे, संस्थापक, समस्त हिंदू आघाडी

शहरातील कोंढवा आणि खडकी येथील अधिकृत  पशूवधगृहे बंद व्हावेत, या मागणीसाठी गोरक्षक, गोसेवक आणि धर्माभिमानी हिंदु बांधवांकडून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक पू. भिडेगुरुजी यांना कायमस्वरूपी विशेष सुरक्षा पुरवा !

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे २९ फेब्रुवारीला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरुवर्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची गाडी अडवून त्यांच्यावर भ्याड आक्रमण करण्यात आले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा ‘सूत्रधार’ शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करा !

पू. भिडेगुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विषारी अन्नपदार्थ खाऊन ३ श्वानांचा मृत्यू !; अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा अटकेत !…

रस्त्यावर फेकलेले विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत ३ श्वानांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राजकारणी आणि साधक यांमधील भेद !

‘राजकारणी सत्ता प्राप्त होईपर्यंत प्रयत्नरत असतात, तर साधक ईश्‍वरप्राप्ती होईपर्यंत प्रयत्नरत असतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत महाशिवरात्र विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ८.३.२०२४
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मार्चला दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

शिवप्रेमींनी १० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ‘बलीदान मास’ पाळण्याचे श्री शिवप्रतिष्ठानचे आवाहन !’

या महिन्याभरात गोड-धोड न खाणे, कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे, पायात चप्पल न घालणे, चहा-कॉफी न पिणे, पान-तंबाखू न खाणे, दूरदर्शन वा चित्रपट न पहाणे, दिवसभरात एक वेळचे जेवण करणे, कोणतीही नवीन खरेदी न करणे अशी बंधने स्वतःवर घालून घेत ते श्रद्धेने पाळले जाते.

हिंदूंच्या नेत्यांना असणारा धोका जाणा !

‘केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी पंतप्रधान मोदी यांना जिवे मारणार’, अशी धमकी कर्नाटकमधील महंमद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने दिली आहे. त्याने सामाजिक माध्यमांतून हातात तलवार घेतलेला एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.