महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपूर २०२४
करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांची मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !

नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) : हिंदु धर्मजागृतीचे कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक धर्मवीर पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ अन् ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा. तशी शिफारस महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे करावी, अशा मागणीचे निवेदन ‘महाराष्ट्र करणी सेने’चे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १९ डिसेंबर या दिवशी दिले. त्या वेळी ‘या मागणीची केंद्र सरकारकडे शिफारस केली जाईल’, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती श्री. अजय सिंह सेंगर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
गेल्या ४ दिवसांपासून नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. अजयसिंह सेंगर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे निवेदन दिले.
श्री. अजयसिंह सेंगर म्हणाले,
‘‘हिंदु धर्मासाठी रात्रंदिवस कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू. संभाजीराव भिडेगुरुजी ही दोन्ही व्यक्तीमत्त्वे वंदनीय आहेत. त्यांनी लाखो हिंदूंना धर्मकार्यासाठी प्रेरित केले. पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना येथे १ मे या दिवशी महाराष्ट्र राज्याने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्यावा, तसेच केंद्र सरकारकडे ‘भारतरत्न’ देण्याविषयी शिफारस करावी’’, अशी मागणी मी निवेदनाद्वारे केली आहे.