कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन
कोल्हापूर – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड आक्रमण करणार्यांचा सूत्रधार शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच पू. भिडेगुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.
१. हुपरी येथे नगर परिषदेत प्रशासकीय अधिकारी क्षितीज देसाई आणि हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री नितीन काकडे, महादेव आडावकर, किरण लोखंडे, गणेश लोखंडे, विकास पाटील, आकाश लोखंडे, दीपक गायकवाड, सागर सुतार, सचिन माळी, प्रसाद म्हेतर, रोहित माने, सोमनाथ पंडित, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
२. गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर कुराडे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. रोहित कांबळे, भाजप विस्तारक आणि सरचिटणीस श्री. संदीप नाथ बुवा, श्री. दीपक भादवणकर, श्री. राजू मोरे, श्री. राहुल शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद धनवडे, सौ. विजया वेसणेकर, तसेच अन्य उपस्थित होते. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनेही स्वतंत्र निवेदन देण्यात आले.
३. आजरा येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री प्रथमेश काणेकर, संदीप पारळे, चेतन बुरुड, उमेश परपोलकर, सतीश शिंदे, विशाल नाईक यांसह अन्य उपस्थित होते.
४. इचलकरंजी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
५. निपाणी (कर्नाटक) येथे तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.
सांगली
सांगली जिल्ह्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मिरज आणि तासगाव येथे निवेदन देण्यात आले. मिरज येथे सर्वश्री विनायक माईणकर, प्रमोद धुळूबुळू, विनायक कुलकर्णी, अधिवक्ता सुमेध ठाणेदार, सोमनाथ गोटखिंडे, श्रेयस गाडगीळ, तसेच अन्य उपस्थित होते.