श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक पू. भिडेगुरुजी यांना कायमस्वरूपी विशेष सुरक्षा पुरवा !

यवतमाळ येथील जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून शासनाकडे मागणी !

यवतमाळ येथे निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

यवतमाळ, ५ मार्च (वार्ता.) – नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे २९ फेब्रुवारीला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरुवर्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची गाडी अडवून त्यांच्यावर भ्याड आक्रमण करण्यात आले. आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार्‍या जमावावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच गुरुजींना कायमस्वरूपी विशेष सुरक्षा पुरवावी, या मागणीचे निवेदन ४ एप्रिल या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या माध्यमातून राज्यशासनाकडे पाठवण्यात आले.

या वेळी विश्व हिंदू परिषदेचे श्री. मनोज औदार्य, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रफुल्ल टोंगे, दत्तात्रय फोकमारे, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सागर लुटे, निलेश पेंडले, सुमित मुनेश्वर, राम राठोड इत्यादी धारकरी उपस्थित होते.

वणी येथेही निवेदन !

वणी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातूनही शासनाकडे अशा स्वरूपाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मंगेश धोबे, वेदांत पिदूरकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री लोभेश्वर टोंगे, लहू खामणकर आणि हितेश गोडे उपस्थित होते.