पुणे शहरातील अधिकृत पशूवधगृहे त्वरित बंद करावीत !- मिलिंद एकबोटे, संस्थापक, समस्त हिंदू आघाडी

 ‘गोवंश बचाव आंदोलन’कडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना निवेदन देतांना डावीकडून डॉ. कल्याण गंगवाल, मिलिंद एकबोटे आणि रवींद्र पडवळ

पुणे, ५ मार्च (वार्ता.) – शहरातील कोंढवा आणि खडकी येथील अधिकृत  पशूवधगृहे बंद व्हावेत, या मागणीसाठी गोरक्षक, गोसेवक आणि धर्माभिमानी हिंदु बांधवांकडून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘समस्त हिंदू आघाडी’चे संस्थापक मिलिंद एकबोटे, गोरक्षक डॉ. कल्याण गंगवाल, ‘समस्त हिंदू बांधव संघटने’चे अध्यक्ष रवींद्र पडवळ, गोरक्षक ऋषिकेश कामठे यांच्यासह अनेक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. ‘गोवंश बचाव आंदोलन’ ४ मार्च या दिवशी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडले.

‘गोवंश बचाव आंदोलना’च्या वेळी मांडलेली सूत्रे

१. शहरातील महापालिकेच्या अंतर्गत असलेली अधिकृत पशूवधगृहे बंद करावीत.

२. दूध उत्पादन क्षमता आणि प्रजनन उत्पादन क्षमता असलेले गाय, म्हैस, बैल, रेडा आणि वळू या गोवंशियांची कत्तल करणे थांबवावे.

३. या पशूवधगृहांमध्ये वैद्यकीय अधिकारी, महापालिकेचा अधिकारी, तसेच प्राणी विभागातील कोणताही अधिकारी उपस्थित नसतो. त्यामुळे अनुमतीपेक्षा अधिक गोवंशियांची कत्तल केली जाते.

४. पशूवध करणे हा फौजदारी गुन्हा मान्य करून विनाअनुमती कत्तल करणार्‍यांवर त्वरित गुन्हे नोंद करावेत.

५. या पशूवधगृहांतून मिळणारा पैसा हा आतंकी कारवायांसाठी वापरला जातो.

६. शहरातील लष्कर भागांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्केट’मध्ये २८ दुकानांमध्ये, तसेच शहरातील अनेक मटणाच्या दुकानांमध्ये गोमांसाची विक्री होते. त्याची विक्री करतांना ‘सांकेतिक भाषा’ वापरली जाते.

७. ज्या ठिकाणी पशूवधगृहे आहेत, त्या ठिकाणी मुसलमानांची वस्ती वाढते. तेथील हिंदू आणि जैन बांधव यांचे जीवन धोक्यात येते, ही वस्तूस्थिती आहे.