तेल अवीव – इस्रायलने हुती आतंकवाद्यांच्या कह्यात असलेल्या येमेनमधील काही भागावर हवाई आक्रमण केले आहे. या आक्रमणात ९ जण ठार झाले. यापूर्वी हुती आतंकवाद्यांच्या गटाने मध्य इस्रायलवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले होते.
इस्रायलने हुती आतंकवाद्यांच्या आक्रमणांना प्रत्युत्तर दिले. या आक्रमणात १४ लढाऊ विमानांचा समावेश होता. या आक्रमणात लाल समुद्रातील ‘रस इसा तेल टर्मिनल’ आणि सलीफ बंदर यांना लक्ष्य करण्यात आले.