
रायगड – मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा घारापुरीला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नौदल, तटरक्षक दल आणि मुंबई पोलीस यांनी राबवलेल्या बचाव कार्यात ११५ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. अद्याप दोघे बेपत्ता आहेत.