श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ५ आतंकवादी ठार झाले. तसेच यामध्ये सुरक्षादलाचे २ सैनिक घायाळ झाले. कुलगाम जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कदेर येथे आतंकवादी लपल्याची गुप्तचर सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाच्या सैनिकांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. सुरक्षादलाचे सैनिक कदेर भागात पोचताच आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार चालू केला. सैनिकांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात आतंकवादी ठार झाले.