नागपूर – अलमट्टी धरणाची उंची मर्यादेबाहेर वाढवण्याचा कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील असंख्य गावे पाण्याखाली जातील. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारचे लक्ष वेधून कर्नाटक सरकारला रोखावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी औचित्याच्या सूत्रावर बोलतांना विधानसभेत केली.
ते म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवली, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापूर येण्याचा धोका या आधीही वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भात वडनेरे समितीचा अहवाल आला आहे. तरी कर्नाटक सरकार धरणाची उंची वाढवत आहे, हे थांबवले पाहिजे.