Darul Uloom Deoband Fatwa : ‘दारुल उलूम देवबंद’चा ‘गझवा-ए-हिंद’ला नव्या फतव्याद्वारे मान्यता !

‘दारुल उलूम देवबंद’चा इतिहास आणि वर्तमान पहाता भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी कारवाया केल्या जात असल्याने तिच्यावर बंदी घालणेच योग्य ठरेल ! यासाठी हिंदूंनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे !

Rajasthan End of VIP Culture : राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफाही ‘ट्रॅफिक सिग्नल’चे पालन करणार !

अती महनीय व्यक्तींच्या रस्त्यावरील प्रवासाच्या वेळी वारंवार होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि या कोंडीमध्ये रुग्णांना होणार्‍या त्रासापासून त्यांची सुटका करण्यासाठी हा निर्णय !

Karnataka Jiziya On Temples : मंदिराला १ कोटी रुपयांची देणगी मिळाल्यास सरकारला द्यावे लागणार १० लाख रुपये !

काँग्रेसला मत देणारे हिंदू या विधेयकाचा विरोध करतील का ? कि त्यांना हे विधेयक मान्य आहे, असे समजायचे ? जर मान्य असेल, तर अशा हिंदूंवर देव कधीतरी कृपा करील का ?

(म्हणे) ‘दंगल घडवणार्‍यांवर नोंद केलेले गुन्हे मागे घ्या !’ – गोव्यातील काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

आक्रमणकर्ते ख्रिस्ती असल्यामुळे सार्दिन त्यांच्या धर्मबांधवांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगत आहेत. यातून त्यांचीही धर्मांधता लक्षात येते. याविषयी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या काँग्रेसच्या अन्य नेत्यांना काय म्हणायचे आहे ?

Goa DressCode In Temples : पणजी येथील प्रमुख २ मंदिरे आणि वेर्णा येथील एक या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

वस्त्रसंहिता लागू करून मंदिराचे पावित्र्य जपणार्‍या पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिर, मळा येथील श्री मारुति मंदिर आणि वेर्णा येथील श्री महालसा मंदिर यांच्यासह अन्य मंदिर समित्यांचे अभिनंदन !

संतांच्या तुलनेत राजकारण्यांचे महत्त्व शून्य !

‘राजकारणी जनतेला पैसे देऊन आणि वाहनाची सोय करून सभेला बोलावतात. याउलट संतांकडे आणि धार्मिक उत्सवात न बोलावताही भक्त लाखोंच्या संख्येने येतात अन् पैसे अर्पण करतात ! यावरून संतांच्या तुलनेत ‘राजकारण्यांचे महत्त्व शून्य आहे’, हे लक्षात येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मंदिरे मुक्त करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा !

मालदा (बंगाल) येथील ‘आदिना’ मशीद परिसरात काही हिंदूंनी पूजा केल्यावर भारतीय पुरातत्व विभागाने गुन्हा नोंदवला. ही मशीद काही शतकांपूर्वी आदिनाथ मंदिर पाडून बांधण्यात आली आहे. येथे अद्यापही देवतांच्या मूर्ती आणि खंडित शिवलिंग आहे.

संपादकीय : भारताचा ‘ग्लोबल डीप स्टेट’ !

भारतामध्ये वर्ष २०१४ पासून हिंदुत्वनिष्ठ निर्णय घेण्याचे प्रयत्न काही प्रमाणात चालू झाले. प्रस्थापित व्यवस्थेला हलवून सोडणारे सरकार सत्तेवर आले.