पणजी येथील श्री महालक्ष्मी, मळा येथील श्री मारुति आणि आणि वेर्णा येथील श्री महालसा मंदिरांत वस्त्रसंहिता लागू
पणजी, २१ फेब्रुवारी (वार्ता.) : गोव्यात डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यानंतर पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिर आणि मळा, पणजी येथील श्री मारुति मंदिर येथे मंदिरात प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
वस्त्रसंहितेविषयीचे फलक मंदिराच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेले आहेत. या फलकांवर लिहिले आहे की, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरात ‘हाफ पँट’, चड्डी, उघडा गळा असलेले वस्त्र, ‘स्लीवलेस टॉप्स’, तोकडे टीशर्ट, ‘मीडी-मिनी स्कर्ट्स’, असे तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करू नये.’’
वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरातही वस्त्रसंहिता लागू
वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरातही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आशयाचा फलक मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.
अशा स्वरूपाची वस्त्रसंहिता गोव्यात यापूर्वी कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिर, मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थान आदी अनेक मंदिरांमध्ये लागू करण्यात आलेली आहे.
संपादकीय भूमिकावस्त्रसंहिता लागू करून मंदिराचे पावित्र्य जपणार्या पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिर, मळा येथील श्री मारुति मंदिर आणि वेर्णा येथील श्री महालसा मंदिर यांच्यासह अन्य मंदिर समित्यांचे अभिनंदन ! |