मुंबई – ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात २९ डिसेंबरला रात्री विलंबाने ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवले. २३ पसार आणि ‘वॉन्टेड’ आरोपींना अटक केली. २१७ ठिकाणी ‘कोम्बिग ऑपरेशन’ करण्यात आले, तर ७ सहस्र ९६४ वाहनांची तपासणी करण्यात आली. विनाशिरस्त्राण दुचाकी चालवणार्या १ सहस्र ८०७ जणांवर, तर १ सहस्र ३५५ चालकांवर मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. या वेळी ६३ मद्यपी चालकांवरही कारवाई करण्यात आली. पहाटे ३ वाजेपर्यंत ही मोहीम चालू होती. अजामीनपात्र वॉरंट बजावून ७७ जणांना, तसेच एन्.डी.पी.एस्. कलमांतर्गत १०४, महिलांविरोधातील आणि गंभीर गुन्ह्यांतील ३१, सराईत चोरांच्या २ टोळ्या, अवैध शस्त्रे प्रकरणी ४९, अवैध मद्य प्रकरणी ९५, तर जुगारासंबंधित ६३ जण, तडीपारीच्या ५०, अनधिकृतपणे रहाणारे, फेरीवाले आदींवरही कारवाया करण्यात आल्या.
या वेळी ५ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १३ पोलीस उपायुक्त, ४१ साहाय्यक पोलीस आयुक्त आणि ९३ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी अन् कर्मचारी सहभागी झाले होते.
संपादकीय भूमिका
|