अहिल्यानगर येथे ‘टिपू सुलतान शरीरसौष्ठव स्पर्धे’चे आयोजन !

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या नावाने होणारा कार्यक्रम त्वरित थांबवण्याची धर्मरक्षक उत्कर्ष गीते यांची मागणी !

अहिल्यानगर – येथील मध्यवर्ती भागात सय्यद फैसल याने ‘टिपू सुलतान सेना’ या संस्थेच्या अंतर्गत ३० डिसेंबर या दिवशी ‘टिपू सुलतान शरीरसौष्ठव स्पर्धे’चे आयोजन केले होते. ‘हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानच्या नावाने अशी स्पर्धा भरवणार्‍या महाराष्ट्राचे कर्नाटक झाले आहे कि काय ?’ असा प्रश्न पडतो,  असे हिंदु धर्मरक्षक उत्कर्ष गीते यांनी व्हिडिओद्वारे निषेध व्यक्त करतांना सांगितले.

उत्कर्ष गीते म्हणाले की, भविष्यात औरंगजेब, अकबराच्या नावाने, महंमद गझनीच्या नावानेही अशा संस्था निघतील आणि या संस्था असेच उपक्रम राबवून मोगलांचे उदात्तीकरण करतील. त्यामुळे नगरचे स्थानिक प्रशासन, पोलीस यांना विनंती आहे की, तुम्ही अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊ नका आणि हे कार्यक्रम त्वरित थांबवा. हा कार्यक्रम रामनवमीच्या मिरवणुकीच्या वेळेस दंगली झालेल्या ठिकाणी आयोजित केला. अशा संवेदनशील भागात पोलिसांनी अनुमती देऊ नये, अशी मागणी आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)