आंबेगाव बुद्रक (पुणे) येथे विनाअनुमती ११ बहुमजली निवासी इमारती बांधल्याचे प्रकरण
पुणे – आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड महाविद्यालयाच्या लगत ११ बहुमजली अनधिकृत निवासी इमारती बांधण्यात आल्या होत्या. महानगरपालिकेतील अतिक्रमण विरोधी पथकाने या इमारतींमधील ५०० सदनिका पाडल्या आहेत. एकूण ४५ सहस्र ५० चौरस फुटाचे बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. या बांधकामांना महापालिका प्रशासनाने वर्ष २०२१ मध्येच नोटीस बजावली होती; परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. पुन्हा वर्ष २०२३ मध्ये टप्प्याटप्प्याने इमारतींना नोटीस पाठवण्यात आली होती.
Pune | 11 अनधिकृत इमारती पुण्यात झाल्या जमीनदोस्त, नागरिकांचे पैसै बुडाले | Zee24taas#pune #illegalconstruction #buildings pic.twitter.com/u8FxSiixYu
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 30, 2023
माजी नगरसेवक अरविंद शिंदे म्हणाले की, ज्या कनिष्ठ अभियंत्याच्या काळात प्रकार घडला, त्याच्यावर गुन्हा नोंद करावा.
संपादकीय भूमिका :अनधिकृत इमारती बांधल्या जाऊ नयेत, यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार ? विनाअनुमती बांधकाम करणार्यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |