अवैध प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाची टाळाटाळ !
कोल्हापूर – लक्षतीर्थ वसाहत येथील अनधिकृतपणे चालू असलेल्या प्रार्थनास्थळाचे पत्रे २९ डिसेंबर या दिवशी तेथील भूमी मालकांनी काढून घेतले. या संदर्भात तेथील भूमीमालक लिलीभाई गोलंदाज म्हणाले, ‘‘ही जागा माझ्या मालकीची असून ‘येथील विनाअनुमती असलेले ‘शेड’ काढून घ्या’, असे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यानुसार आम्ही या शेडवरील पत्रे उतरून घेत आहोत.’’
दोन दिवसांपूर्वी या परिसरातील अवैध प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याने विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांसह सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी महापालिका प्रशासनास जाब विचारला होता. (प्रशासनातील कर्तव्यचुकारांवर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक) हे अवैध बांधकाम तोडण्यासाठी संघटनांनी १ जानेवारीपर्यंत महापालिकेस कालावधी दिला होता. मध्यंतरीच्या कालावधीत येथील जागामालकाने हे पत्रे काढून घेतले आहेत. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उर्वरित अवैध बांधकामेही जागामालकांनी काढून घ्यावीत ! – पराग फडणीस, बजरंग दल
बजरंग दलाचे कोल्हापूर जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस म्हणाले, ‘‘लक्षतीर्थ वसाहत येथे ३ अवैध प्रार्थनास्थळे असून त्यांचा तेथील हिंदूंना पुष्कळ त्रास होतो. ज्याप्रकारे एका जागामालकांनी स्वत:हून हे बांधकाम काढून घेतले, त्याचप्रकारे तणाव टाळण्यासाठी अन्य दोन भूमीमालकांनीही अवैध बांधकामे काढून घ्यावीत’, अशी मागणी आम्ही करतो.’’ याच समवेत विशाळगड येथेही जी अनधिकृत बांधकामे झाली आहेत, तीही त्यांनी तात्काळ काढून घ्यावीत. यामुळे कोट्यवधी रुपयांचे पाडकाम करण्यासाठीचा निधी वाचेल. असे झाले, तर हिंदु मुसलमानांसमवेत गुण्यागोविंदाने राहू शकतील ! असे झाले नाही, तर धर्मांधांच्या अवैध कारवाया आम्ही चालू देणार नाही ! त्याला सर्वच पातळीवर विरोध केला जाईल !
संपादकीय भूमिका :ठिकठिकाणी उभारण्यात येणारी अनधिकृत प्रार्थनास्थळे हटवण्यासाठी हिंदूंना का सांगावे लागते ? प्रशासन स्वतःचे कर्तव्य का पार पाडत नाही ? |