अखंड ईश्वरी अनुसंधानात असणारे पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७४ वर्षे) !

पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांच्याकडे आम्ही दोघे (श्री. अशोक सारंगधर आणि सौ. जयश्री सारंगधर) भेटायला गेलो होतो. त्या वेळी मला (सौ. जयश्री सारंगधर) देवाच्या कृपेने जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजप केल्यामुळे श्रीमती उषा मोहे यांना झालेले लाभ !

सद्गुरु गाडगीळकाकांच्या लेखात दिल्याप्रमाणे नामजप केल्याने रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण सर्वसाधारण होणे आणि नंतर ते न वाढणे..

प्रामाणिकपणे समाजसाहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्यभाव असणारे संभाजीनगर येथील सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७४ वर्षे) !

सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांचा आज मार्गशीर्ष कृष्ण तृतीया (३०.१२.२०२३) या दिवशी ७४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची मुलगी होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास येथे दिला आहे.

प्रेमळ आणि सतत देवाच्या अनुसंधानात असणारे नंदीहळ्ळी, जिल्हा बेळगाव येथील श्री. नारायण राऊत (वय ६९ वर्षे) !

‘श्री. नारायण रामू राऊत ३० वर्षांपासून वारकरी संप्रदायानुसार साधना करत आहेत. मागील २६ वर्षांपासून ते वर्षातून २ वेळा पंढरपूरच्या वारीला जातात. बेळगाव येथील साधिका सौ. तारा शेट्टी यांना राऊतकाकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चिंचवड, पुणे येथील सौ. प्रीती संजय एखंडे यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

वर्ष २०१५ मध्ये मी दुचाकीवरून प्रवास करतांना अपघात झाला होता. त्या वेळी माझ्या माकडहाडाला मार लागला होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी अडीच मास पूर्णपणे झोपून रहायला सांगितले होते; परंतु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने आणि नामजपाचे उपाय केल्यावर मी केवळ १५ दिवसांत उठून बसू शकले.

देवाची ओढ असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वर्धा येथील चि. हरिअंश मिलिंद निखार (वय २ वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्ण तृतीया (३०.१२.२०२३) या दिवशी चि. हरिअंश मिलिंद निखार याचा द्वितीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि आजी यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांना आईच्या मायेने घडवणार्‍या सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘पू. (सौ.) अश्विनी पवार देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी सत्संग घेतात. त्या वेळी ‘ईश्वरी चैतन्य कार्यरत होऊन त्यांच्या मुखातून ईश्वरच बोलत आहे’, असे मला जाणवते. त्यामुळे ‘त्या सत्संगात साधक अंतर्मुख होतो’, असे मला जाणवते.

‘डोळे येणे’ या आजारावर नामजपाचे उपाय केल्याने डोळे बरे होणे

मी २ दिवस प्रतिदिन एक घंटा जप केल्यानंतर माझ्या डोळ्यांचा लालसरपणा नाहीसा झाला. माझ्या डोळ्यांतून पाणी येणे थांबले आणि डोळ्यांची खाजही ५० टक्क्यांनी न्यून झाली. गुरुमाऊलींनी मला त्यांची कृपा अनुभवण्याची संधी दिली.

विठ्ठलवाडी (कल्याण) येथे ७ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त !

विठ्ठलवाडी येथील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीत अनधिकृतरित्या गुटख्याचा साठा असल्याची आणि त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.