देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे वक्तव्य पालटावे लागेल ! – मनोज जरांगे पाटील

उपमुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील सरसकट सर्व गुन्हे मागे घेणार नसल्याचे राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात लेखी उत्तर देऊन स्पष्ट केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना २४ डिसेंबरपर्यंत त्यांचे म्हणणे मागे घेण्याची चेतावणी दिली आहे.

पुणे येथील श्रीमद्भगवद्गीता पठणाच्या विक्रमाची नोंद ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये !

स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर ३ डिसेंबर या दिवशी १० सहस्र ६८२ लोकांनी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत भावपूर्ण गीतापठण केले. विविध वयोगटांतील भाविकांनी सहभाग घेऊन गीतेतील ७०० श्लोकांचे उत्स्फूर्तपणे पठण करून विक्रम प्रस्थापित केला.

तळवडे घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित !

ससून रुग्णालयात उपचार चालू असलेल्या रुग्णांची शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी भेट घेतली. तळवडे घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.

गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले जातात, तसेच नाताळ आणि ३१ डिसेंबरलाही या आदेशांचे पालन व्हावे ! – पतित पावन संघटना

रात्री बारानंतर सर्व प्रकारचे आवाज बंद करावेत; मात्र असे झाले नाही, तर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करू, अशी चेतावणी ‘पतित पावन संघटने’कडून देण्यात आली आहे.

पोषण आहारात अंडी नकोच !

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारात अंड्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. शाकाहारी चळवळीसह अनेक संघटनांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

ठाणे महापालिकेचा लाचखोर स्वच्छता कामगार कह्यात !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.

हिंदूंनो, ही धोक्याची घंटा जाणा !

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील पडघा या गावाला इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी ‘अल् शाम’ असे नाव दिले आहे. आतंकवादी साकिब नाचन हा तेथील ‘खलिफा’ (प्रेषिताचा वारस) होता. त्याच्यासह १५ आतंकवाद्यांना येथून अटक करण्यात आली आहे.

विधानसभा अधिवेशनाच्या काळात अनावश्यक विषयांवर अकारण चर्चा !

अनावश्यक विषयांवर चर्चा करणारे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न कधी गांभीर्याने सोडवू शकतील का ?

गोव्यातील घटस्फोट कायद्यांमध्ये पालट अत्यावश्यक !

‘विवाह आणि घटस्फोट या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. एकात जोडणे, तर एकात तोडणे अभिप्रेत असते. दोन्ही गोष्टी अत्यंत बेभरवशाच्या झालेल्या आहेत; कारण या दोन गोष्टींमधील अंतर ही अल्प होत चालले आहे.