मुंबई – उपमुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील सरसकट सर्व गुन्हे मागे घेणार नसल्याचे राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात लेखी उत्तर देऊन स्पष्ट केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना २४ डिसेंबरपर्यंत त्यांचे म्हणणे मागे घेण्याची चेतावणी दिली आहे. असे न झाल्यास मराठा काय आहे ? हे समजेल. सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील. गृहमंत्र्यांनी माफी मागून सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सरकारला गुन्हे मागे घ्यावेच लागतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
जालना येथील आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केल्याने ५० आंदोलक आणि ७९ पोलीस घायाळ झाले आहेत. त्यामुळे सर्व गोष्टींची निश्चिती केल्यानंतर या प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया चालू केली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.