ठाणे महापालिकेचा लाचखोर स्वच्छता कामगार कह्यात !

ठाणे, १० डिसेंबर (वार्ता.) – पाण्याच्या थकित देयकाची रक्कम अल्प करून देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील स्वच्छता कामगार सुभाष गरुड (वय ५४ वर्षे) याने ४८ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ठरलेली ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गरुड याला कह्यात घेतले आहे. सुभाष गरुड याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)