पतित पावन संघटनेकडून पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर भजन करण्याची चेतावणी
पुणे – शहरात प्रतिवर्षी नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी मेजवान्यांचे आयोजन केले जाते, तसेच या मेजवान्यांच्या वेळी रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात ‘साऊंड’ चालू असतात. त्यामुळे जर गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले जातात, तर यंदा नाताळ आणि ३१ डिसेंबरलाही या आदेशांचे पालन व्हावे. रात्री बारानंतर सर्व प्रकारचे आवाज बंद करावेत; मात्र असे झाले नाही, तर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करू, अशी चेतावणी ‘पतित पावन संघटने’कडून देण्यात आली आहे. यासंदर्भात पतित पावन संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
असे निवेदन आम्ही पुण्याचे प्रभारी सहआयुक्त रामनाथ पोकळे, तसेच पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिले आहे. त्या वेळी संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. दिनेश भिलारे, पुणे शहर अध्यक्ष स्वप्निल नाईक, पुणे शहराचे संपर्कप्रमुख गुरु भाऊ कोळी, पुणे शहराचे संघटक मिलिंद भाऊ तिकोणे, पुणे शहराचे उपाध्यक्ष यादवजी पुजारी, कसबा मतदारसंघाचे प्रमुख श्री. योगेश भैय्या वाडेकर आदी उपस्थित होते.