Indian Navy Day 2023 Reharsals : तारकर्ली येथील समुद्रकिनारी नौदलाच्या युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिकांना प्रारंभ !

या समारंभाचा भाग म्हणून नौदलाच्या युद्धनौका २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत येथे सराव करणार होत्या. त्यानुसार आज २८ नोव्हेंबरला युद्धनौकांच्या प्रात्यक्षिकांच्या सरावाला प्रारंभ झाला आहे.

शाळेत शिक्षक मिळावा, यासाठी आज शिरगाव (देवगड, सिंधदुर्ग) येथे रस्ताबंद आंदोलन होणार !

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर शाळेत शिक्षक मिळावा यासाठी आंदोलन करावे लागणे हे दुर्दैवी आणि प्रशासनाला लज्जास्पद !

Shocking : कुडचडे (गोवा) येथे एका महिलेची इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या

कुडचडे पोलिसांनी या घटनेच्या पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे या परिसरातील लोकांना प्रचंड धक्का बसला आहे.

54th iffi 2023 GOA Conclusion : ‘एंडलेस बॉर्डर्स’ चित्रपटाला यंदाचा सुवर्ण मयूर पुरस्कार !

यंदा आंचिममध्ये जगभरातील ७ सहस्र प्रतिनिधी उपस्थित होते, तसेच महोत्सवात ७८ देशांतील २७० चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. ‘हॉलिवूड चित्रपट निर्माते मायकल डग्लस यांनी त्यांचा पुढचा चित्रपट गोव्यात करावा’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

विनयभंगप्रकरणी उपवनसंरक्षक विजय माने निलंबित !

महिला अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये संबंधित अधिकार्‍यांचे केवळ निलंबन होते. निलंबन झाले, तर ६ मास त्यांना निम्मे वेतन मिळते आणि बहुतांश अधिकारी ६ मासांनंतर परत कामावर उपस्थित होतात !

१० दिवसांत मराठी पाट्या न दिसल्यास मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल !

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये घुसून मराठी पाट्यांच्या सूत्रावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना अडवून कह्यात घेतले.

…तर मग बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार कृतीत आणा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

सरकारचा काही धाक आहे कि नाही ? न्यायालय, पोलीस, सरकार यांची भीती राहिली नाही, तर आपण अराजकतेकडे जाऊ, असे या वेळी राज ठाकरे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे प्रदूषण करणार्‍या ६०४ जणांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई !

प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक, विक्रेते आदी ६०४ जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या.

मराठवाड्यातील १०७ मंडळांत अवकाळी पावसामुळे १० सहस्र हेक्टरहून अधिक पिकांची हानी !

२६ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या पावसाने या विभागातील १० सहस्र हेक्टरहून अधिक पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषीतज्ञांनी व्यक्त केला आहे. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात ४ सहस्र हेक्टरहून अधिक हानी झाली आहे.

संगमनेर (अहिल्यानगर) येथील क्रूरकर्मा टिपू सुलतानचे चित्र असलेला फलक तात्काळ हटवा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांच्या हे का लक्षात येत नाही ?