राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सतत तळमळीने सेवा करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर !

कार्तिक कृष्ण द्वितीया (२९.११.२०२३) या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

श्री गुरु तारिती सार्‍यातूनी ।

‘श्री गुरूंनी ज्याला कृपाछत्राखाली घेतले, त्याच्या सर्व संकटांचे हरण श्रीगुरुच करतात. आईने बाळासाठी धाव घ्यावी, तसे गुरु भक्तासाठी धावून येतात. मग ‘भक्ताने चिंता का करावी ?’, हे मनाला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.

मनगटाचा अस्थीभंग झाल्यावर सकारात्मक आणि भावस्थितीत राहून अखंड गुरुकृपा अनुभवणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सौ. स्मिता कानडे (वय ५६ वर्षे) !

रुग्णालयात जातांना भगवंताने मला विचार दिला, ‘प्रारब्ध आनंदाने आणि भावाच्या स्थितीत राहून भोगूया.’ भगवंतानेच माझ्याकडून भावाचे प्रयत्न करून घेतले. यासाठी भगवंत आणि गुरुदेव यांच्या चरणी कितीही वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती वसुधा देशपांडे (वय ७० वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

साधारण दीड वर्षापासून नामजप करायला लागल्यानंतर तंबोर्‍याची तार छेडल्यासारखे होऊन शरिरातून सूक्ष्म आवाज येतो आणि कंप होतो. त्यामुळे मला त्रास न होता आनंद होतो.

गॅसवरील कढई वाकडी होऊन उकळते तेल हातावर पडतांना घाटकोपर, मुंबई येथील कु. आदिनाथ बांगर याने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

कढईतील उकळते तेल हातावर पडल्यामुळे मला पुष्कळ त्रास होत होता. घरी आल्यानंतर माझा नामजप आपोआप चालू झाला आणि नामजपामुळे मला होणारा त्रास पुष्कळ प्रमाणात उणावला. गुरुदेवांच्या कृपेमुळे ही अनुभूती आल्याने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो !

पैठण येथे ४५० वर्षांनंतर श्री संत एकनाथ महाराजांच्या हस्ताक्षरातील एकनाथी भागवत गीतेची हत्तीवरून मिरवणूक !

शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज समाधी चतु:शतकोत्तर सुवर्णमहोत्सव तथा ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत जयंती महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळा याची २७ नोव्हेंबर या दिवशी येथे सांगता झाली.