
मुंबई – सरकार केवळ मराठी आणि हिंदुत्व यांविषयी तोंड वाजवत आहे. न्यायालयाने सांगूनही दुकानांना मराठी पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत. न्यायालयाने सांगूनही मशिदींवरील भोंगेही सरकारला काढता आलेले नाहीत.‘बाळासाहेबांच्या विचारांनी सरकार चालवता’ म्हणता, मग त्यांचे कोणते विचार कृतीत आणले ? ‘बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार कृतीत आणा’, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
सरकारचा काही धाक आहे कि नाही ? न्यायालय, पोलीस, सरकार यांची भीती राहिली नाही, तर आपण अराजकतेकडे जाऊ, असे या वेळी राज ठाकरे म्हणाले. अमली पदार्थांच्या रॅकेटविषयी पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले, ‘‘अमली पदार्थांचे रॅकेट सर्व देशभरात पसरले आहे. माझा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे. पोलिसांना २४ घंटे मोकळीक दिली, तर सर्व वठणीवर येतील; परंतु तसे करायचे नाही. अमली पदार्थांचा पैसाच जर सर्वत्र वापरला जातो की काय ? अशी शंका येते.’’
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !