संगमनेर (अहिल्यानगर) येथील क्रूरकर्मा टिपू सुलतानचे चित्र असलेला फलक तात्काळ हटवा !

बजरंग दलाची पोलिसांकडे मागणी

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – शहरामध्ये जोर्वे नाका परिसरात टिपू सुलतानचे चित्र असलेला फलक लावण्यात आला आहे. या फलकामुळे संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. (अत्याचारी टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे उद्या त्याच्या सारखे वागू लागले, तर नवल ते काय ? – संपादक) टिपू सुलतान हा अन्यायकारी आणि हिंदूंवर अत्याचार करणारा प्रशासक होता. अशा या जुलमी, अत्याचारी टिपू सुलतानची जयंती साजरी करून त्याचे उदात्तीकरण करणार्‍यांवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवावा, तसेच हा फलक लावणार्‍यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. टिपू सुलतानचा फलक तात्काळ हटवण्यात यावा म्हणून बजरंग दलाच्या वतीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली.

संपादकीय भूमिका :

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांच्या हे का लक्षात येत नाही ?