प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे गोवाभर तीव्र पडसाद

संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे मुसलमानांनी संबंधित पोलिसांकडे केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात मुसलमानांनी ‘जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे.

मिरज येथे ‘डॉल्बी’च्या आवाजामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय !

परिसरातील नागरिकांनी मिरवणुकीत चालू असलेल्या ‘डॉल्बी’च्या आवाजामुळे त्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आला असावा, असे सांगितले. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

गोव्यात एप्रिल २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेतल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला भाजप, काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गोव्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

गोव्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. कुशावती, म्हादई आदी नद्या दुथडी भरून वहात आहेत.

शरद पवार सत्तेत असतांना मराठ्यांना आरक्षण का नाही ? – मुनगंटीवार

धनगर समाजाच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधी का गेले नाहीत ? शरद पवार सरकारमध्ये असतांना मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही ? असा प्रश्न वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ३० सप्टेंबर या दिवशी उपस्थित केला आहे.

‘ईडी’कडून ८ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट !   

‘जंबो कोविड सेंटर’ घोटाळ्यात आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप ‘ईडी’कडून करण्यात आला होता. यात सुजित पाटकर यांना अनधिकृतरित्या कंत्राट दिले गेल्याचा दावा करण्यात आला, तसेच बनावट देयके दाखवून अतिरिक्त लाभ मिळवला गेला, असा आरोप सुजित पाटकर आणि आधुनिक वैद्य बिसुरे यांच्यावर करण्यात आला आहे.

हिंदूबहुल भारतातील मंदिरेही असुरक्षित !

उन्नाव (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील बांगरमऊ गावात जावेद नावाच्या एका मुसलमान युवकाने येथील ऐतिहासिक बाबा बोधेश्वर महादेव मंदिरात घुसून ३ भाविकांवर लाठीने आक्रमण केले. यामध्ये ते गंभीररित्या घायाळ झाले.

पुढील पिढ्यांवर तामसिक संस्कार होण्यामागील कारण !

‘सात्त्विक चित्रकार देवतेची सात्त्विक चित्रे काढतात. याउलट एम्.एफ्. हुसेनसारखे तामसिक चित्रकार देवतेची नग्न, तामसिक चित्रे काढतात. यात आश्चर्य एवढेच की, मृतवत हिंदूंनी त्यासंदर्भात वर्षानुवर्षे काही केले नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांवरती तसे संस्कार झाले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित ‘हरितक्रांती’ !

एवढ्या वर्षांत रासायनिक वा कृत्रिम अशी कोणतीच यंत्रणा नसतांना देशाने शेतीत संपन्नता अनुभवली आहे. त्यामुळे त्याच मार्गाचा अवलंब करून डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित हरितक्रांतीचे स्वप्न साकार करू शकतो आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !