मिरज – मिरज शहरात अनंतचतुर्दशीला रात्री चालू असलेल्या मिरवणुकीत एका व्यक्तीचा ‘डॉल्बी’च्या (मोठा आवाज करणारी ध्वनीयंत्रणा) आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. २८ सप्टेंबरला मिरवणूक संपल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? हे अद्याप स्पष्ट नसून परिसरातील नागरिकांनी मिरवणुकीत चालू असलेल्या ‘डॉल्बी’च्या आवाजामुळे त्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आला असावा, असे सांगितले. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. तासगाव येथे ‘डॉल्बी’मुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.