शासन दायित्‍व झटकू शकत नाही ! – मुंबई उच्‍च न्‍यायालय

अनेक रुग्‍ण अत्‍यवस्‍थ स्‍थितीत रुग्‍णालयात आल्‍याने उपचाराच्‍या वेळी त्‍यांचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याचा युक्‍तीवाद राज्‍याचे महाधिवक्‍ता बीरेंद्र सराफ यांनी केला.

देहलीतील ‘एम्स’ रुग्णालयात चालू होणार ‘आध्यात्मिक औषधोपचार’ विभाग !

मनुष्य जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची उत्तरे अर्थातच अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. अध्यात्माविषयी काडीचेही ज्ञान नसणारे काही डॉक्टर यास विरोध करतात, यात काय आश्‍चर्य ?

परमाणु क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा व्लादिमिर पुतिन यांचा धक्कादायक दावा !

यासंदर्भात पुतिन यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी ‘आम्ही रशिया ३ दशकांनंतर पुन्हा एकदा परमाणु परीक्षणास आरंभ करू शकतो. यासाठी ‘परमाणु परीक्षण प्रतिबंध करारा’तून आम्ही बाहेरही पडू शकतो’, असे विधान केले होते.

धर्मकार्य करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये  सहभागी व्हा ! -कालीचरण महाराज !

देशाचे पुन्हा तुकडे पाडून भारताचे ‘गजवा-ए-हिंद’ बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. हे थांबवण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्र, रामराज्य आले पाहिजे.

‘जे.के.डी.एफ्.पी’ या राजकीय संघटनेवर लादण्यात आली ५ वर्षांची बंदी !

ही संघटना वर्ष १९९८ पासून देशविरोधी कारवायांमध्ये गुंतली होती. या संघटनेने भारतातील फुटीरतावाद आणि आतंकवाद यांना प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

शीख तरुणाला ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

वर्ष १९१९मधील भारतातील अमृतसर येथील जालीनवाला बागेतील नरसंहराच्या घटनेचा सूड उगवण्यासाठी महाराणीची हत्या करू इच्छित होता, असे त्याने एका व्हिडिओद्वारे सांगितले होते.

कॅनडाने भारतातील त्याच्या ४१ अधिकार्‍यांना हटवले

भारत आणि कॅनडा यांच्यात खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येच्या प्रकरणात भारतावर आरोप करण्यात आल्यापासून वाद निर्माण झाला आहे.

श्री तुळजाभवानीदेवीचे २०७ किलो सोने वितळवण्यास विधी विभागाची अनुमती !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यास तेथे कशा प्रकारे व्यवहार चालतात, याचे हे उदाहरण होय ! त्यामुळे मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !  

सीरियामध्ये सैन्य अकादमीवर झालेल्या आक्रमणात १०० हून अधिक लोक ठार  

सीरियाच्या हुम्स शहरामध्ये आतंकवाद्यांनी सैन्य अकादमीवर ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणात अनुमाने १०० लोक ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले.

ट्रुडो आणि झेलेंस्की मूर्ख ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुनावले

कॅनडाच्या संसदेत नाझी सैनिकाचा सन्मान केला जात होता आणि तेथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्षही उपस्थित होते. ते एक ज्यू आहेत. त्यांच्यात ज्यूंचे रक्त आहे.’’ नाझी सैनिकांनी ज्यूंचा वंशसंहार केला होता.