सनातन धर्माचा अवमान केल्‍याविषयी उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा !

सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍याप्रकरणी तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात यावा.

अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे स्थानांतर !

अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे एक वर्षापूर्वी सातारा येथून सांगली येथे स्थानांतर झाले होते. सातारा येथे असतांना निर्भया पथकांची स्थापना, ए.टी.एम्.मधून चोरी करणार्‍या टोळ्यांचा बंदोबस्त करणे यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते.

छत्रपती संभाजीनगर येथे लाचखोरीच्‍या गुन्‍ह्यात अटक असतांनाही २१६ कर्मचारी शासनाच्‍या सेवेत !

काही पाश्‍चात्त्य देशांत लाच घेणार्‍यांना मृत्‍यूदंड अथवा जन्‍मठेप अशी कठोर शिक्षा केली जाते. भारतात अशी शिक्षा नसल्‍याचा परिणाम !

सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या मानाच्या सासनकाठीला केंद्रशासनाचे ‘कॉपीराईट’ नामांकन !

श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेत प्रथम क्रमांकाचा मान असणार्‍या सातारा जिल्ह्यातील मानाच्या सासनकाठीला केंद्रशासनाचे ‘कॉपीराईट’ नामांकन प्राप्त झाले. याचा प्रकाशन सोहळा जोतिबा देवाच्या मुख्य मंदिरात २ ऑक्टोबरला पार पडला.

मिरज येथे ‘डॉल्‍बी’ आणि ‘लेझर लाईट’ विरोधी उत्‍स्‍फूर्त बैठक : चळवळ चालू करण्‍याचा निर्धार !

मशिदींवरील मोठ्या आवाजाचे अनधिकृत भोंगे बंद व्‍हावेत. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीविषयी आचारसंहिता बनवून त्‍या संदर्भात प्रसार व्‍हावा. या संदर्भात निवेदन देणे.

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधानांच्या हस्ते २६ ऑक्टोबरला होणार उद्घाटन ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

राज्यात ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २६ ऑक्टोबरपासून चालू होणार आहे. स्पर्धेची सिद्धता पूर्णत्वाकडे आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू मैदानात स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

एर्नाकुलम् (केरळ) येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्‍यात्‍म’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

‘अध्‍यात्‍माची आवश्‍यकता, मंदिरात दर्शन घेण्‍याची योग्‍य पद्धत, कुलदेवतेची पूजा का आणि कशी करावी ?’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या व्‍याख्‍यानाचा लाभ ‘श्री नारायण धर्मपरिपालन योगम’च्‍या अनेक सदस्‍यांनी घेतला.

‘ड्रग माफिया’ ललित ‘ससून रुग्‍णालया’मध्‍ये रहाण्‍यासाठी प्रतिदिन ७० सहस्र रुपये देत असल्‍याचे उघड !

प्रकृती अस्‍वास्‍थ्‍याचे कारण देत हा गेली १६ मास ‘ससून’मधील विभाग क्र. १६ मध्‍ये उपचार घेत होता. तेथूनच तो ‘मेफेड्रॉन’ या अमली पदार्थाच्‍या विक्रीची यंत्रणा राबवत होता.

नाशिक येथे मुंबई पोलिसांकडून अमली पदार्थाच्‍या कारखान्‍यावर धाड

मुंबई येथील साकीनाका पोलिसांनी अमली पदार्थ बनवणार्‍या नाशिक येथील कारखान्‍यावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांचे एम्.डी. (मॅफेड्रॉन) जप्‍त केले आहे.

महाराष्‍ट्रात गायींच्‍या संख्‍येत मोठी घट !

गोवंश रक्षणाची योग्‍य उपाययोजना काढण्‍याऐवजी विज्ञानाचा वापर करून अघोरी उपाय काढणे कितपत योग्‍य आहे ?