कॅनडाने भारतातील त्याच्या ४१ अधिकार्‍यांना हटवले

  • भारताने दिलेल्या आदेशानंतर कॅनडा नरमला !

  • अधिकार्‍यांचे सिंगापूर आणि मलेशिया येथे स्थानांतर !

ओटावा (कॅनडा)- भारताने दिलेल्या आदेशानंतर अखेर कॅनडाने त्याच्या भारतातील दूतावासातील अतिरिक्त ४१ अधिकार्‍यांना हटवले. त्यांना आता सिंगापूर आणि मलेशिया येथे स्थानांतरित केले आहे. भारताने कॅनडाला या संदर्भात १० ऑक्टोबरपर्यंतची समयमर्यादा दिली होती.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा यांच्यात खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येच्या प्रकरणात भारतावर आरोप करण्यात आल्यापासून वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारताने कॅनडाला त्याच्या अधिकार्‍यांची संख्या अल्प करण्यास सांगितले होते.

संपादकीय भूमिका

भारताने अशा प्रकारचे कठोर भूमिका घेऊन खलिस्तान समर्थक कॅनडा सरकारवर दबाव आणला पाहिजे !