|
यवतमाळ, ४ ऑक्टोंबर (वार्ता.) – हिंदूंनो, चिरंतर सत्कर्म करत रहा, धर्मकार्य करण्यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, रा.स्व. संघ, सनातन संस्था, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनामध्ये सहभागी होऊन त्यांना तन, मन आणि धन यांद्वारे सहकार्य करा, असे आवाहन कालीपुत्र कालीचरणजी महाराज यांनी केले. ते तिरंगा चौक येथे ३ ऑक्टोबर या दिवशी बजरंग दलाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रे’च्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज औदार्य, बजरंग दलचे राम लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी त्यांनी ‘हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, त्यामध्ये लँड जिहाद, लव्ह जिहाद, लोकसंख्या जिहाद, ‘यु.पी.एस्.सी. जिहाद’ यांविषयीची भीषणता मांडली. देशाचे पुन्हा तुकडे पाडून भारताचे ‘गजवा-ए-हिंद’ बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. हे थांबवण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्र, रामराज्य आले पाहिजे. धर्मरक्षणासाठी कायदे बनले पाहिजेत. भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद, संघटनवाद सोडून सनातन धर्मासाठी एकत्र आले पाहिजे. आपली संस्कृती जपण्यासाठी उत्सवातील अपप्रकार थांबले पाहिजेत,
राजनीतीचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजे’, असे बहुमूल्य मार्गदर्शन केले.