मैसुरू (कर्नाटक) येथे पोलिसांच्या बंदोबस्तात साजरा करण्यात आला ‘महिषा दसरा’ !

हिंदु धर्माच्या विरोधात जाणीवपूर्वक द्वेष पसरवणार्‍यांना महिषासुरच प्रिय असणार, यात काय शंका ? असे लोक समाजात नैतिकता, प्रेम आणि सद्भाव कधीतरी निर्माण करतील का ?

(म्हणे) ‘हिंदु धर्मात शूद्र म्हणजे वेश्येचा मुलगा !’ – प्राध्यापक के.एस्. भगवान 

अशा प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले असेल, याची कल्पनाच करता येत नाही ! शिक्षक नीतीमत्तेचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतो; मात्र येथे असे प्राध्यापक समाजात द्वेष पसरवत आहेत !

ससून रुग्णालयाची नकारात्मक प्रतिमा खपवून घेणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी ससून रुग्णालयाच्या संदर्भातील तक्रारींसह तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. डॉ. ठाकूर यांनी रुग्णालयाच्या विविध अंतररुग्ण, बाह्यरुग्ण, शस्त्रक्रिया, तसेच मृत्यूमुखींची माहिती देणारे सादरीकरण केले.

गांधीनगर महावितरण कार्यालयासमोर उद्धव ठाकरे गटाची निदर्शने !

दसरा आणि दीपावली यांमुळे वस्तूंची विक्री आणि देवाणघेवाण वाढली आहे. याचसमवेत उन्हाची तीव्रता वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. असे असतांना महावितरणकडून दुरुस्तीच्या नावाखाली सतत भारनियमन होत आहे.

देशाचा संसार चांगला होण्यासाठी आम्ही श्री दुर्गामातेकडे आशीर्वाद मागायला आलो आहोत ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री दुर्गादेवी शिवछत्रपतींचे कार्य करण्यासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती आपल्याला देईल, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

कॅबचालकाकडून तरुणीचा विनयभंग !

तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

तीन बांगलादेशी महिलांना अटक !

बांगलादेशातून विनापारपत्र वैध कागदपत्रांविना घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी भारतात प्रवेश केल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

एटीएम् कार्डची चोरी करणारा मुसलमान अटकेत !

वाशीतील मुख्य टपाल कार्यालयात रोजंदारीवर काम करणारा महंमद अन्सारी या कर्मचार्‍याने बँकेने ग्राहकाला पाठवलेल्या तीन एटीएम् कार्डची चोरी करून परस्पर पैशांचा अपहार केला.

टोलमधून एस्.टी.ला मुक्ती देण्याची मागणी !

एस्.टी.चा संचित तोटा ९००० कोटी रुपयांच्या घरात असून पुरवठादारांची ८५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. याचा फेरविचार करून टोलमधून एस्.टी.ला मुक्ती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एस्.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

महाराष्ट्रासह गुजरात येथे ७० ठिकाणी ‘ईडी’ची धाड

या धाडीमध्ये कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिर्‍यांचे दागिने आणि भारतीय चलन कह्यात घेण्यात आले. त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या कालावधीसाठी कह्यात घेतली आहे.