मुंबई – महाराष्ट्रासह गुजरात येथे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ७० ठिकाणी धाड घालूने ३१५ कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात घेतली. १३ ऑक्टोबरला ही कारवाई केली. महाराष्ट्रातील जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड येथे, तर गुजरातमधील कच्छ येथे धाड टाकण्यात आली. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्.एल्. गोल्ड आणि मनराज ज्वेलर्स अन् त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी यांवर धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिर्यांचे दागिने आणि भारतीय चलन कह्यात घेण्यात आले. त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या कालावधीसाठी कह्यात घेतली आहे.