मुंबई – एस्.टी.ला प्रतिदिन टोल भरावा लागतो. त्यामुळे एस्.टी. महामंडळाला प्रतिवर्षी सरासरी १६२ ते १६७ कोटी रुपये इतका टोल भरावा लागत आहे. एस्.टी.चा संचित तोटा ९००० कोटी रुपयांच्या घरात असून पुरवठादारांची ८५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. याचा फेरविचार करून टोलमधून एस्.टी.ला मुक्ती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एस्.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.