पुणे – ललित पाटील यासारखी प्रकरणे रुग्णालयात होत असल्यामुळे जर ससून रुग्णालयाची प्रतिमा नकारात्मक होत असेल, तर ते गंभीर आहे. हे खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी बीजे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता (डीन) डॉ. संजीव ठाकूर यांना खडसावले. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी ससून रुग्णालयाच्या संदर्भातील तक्रारींसह तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. डॉ. ठाकूर यांनी रुग्णालयाच्या विविध अंतररुग्ण, बाह्यरुग्ण, शस्त्रक्रिया, तसेच मृत्यूमुखींची माहिती देणारे सादरीकरण केले.