गोवा : अन्न आणि औषध प्रशासनाकडून माध्यान्ह आहार पुरवठादाराची अनुज्ञप्ती रहित

‘‘सरकार असे प्रकार खपवून घेणार नाही. चांगल्या दर्जाचा माध्यान्ह आहार पुरवणार्‍या स्वयंसाहाय्य गटाच्या कामात सरकार हस्तक्षेप करणार नाही; मात्र निष्काळजीपणा करणार्‍या गटांवर कारवाई करण्यात येईल.’’ – मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग ते मुंबई ‘शिवशौर्य यात्रा’ : उद्या दोडामार्ग येथून प्रारंभ

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एका कार्यक्रमासाठी कर्णकर्कश ध्‍वनीक्षेपक लावल्‍याप्रकरणी महापालिकेवर गुन्‍हा नोंद का झाला नाही ? – मनसे

गणेशोत्‍सवाच्‍या काळात डीजे वाजवण्‍यास बंदी असूनही अनेक जण कर्णकर्कश आवाजात ध्‍वनीक्षेपक आणि डीजे वाजवत आहेत. यामुळे शहरातील २२ गणेशोत्‍सव मंडळांवर पोलिसांनी गुन्‍हे नोंद केले आहेत.

नागपूर येथे ७ सहस्र १७७ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

श्री गणेशमूर्ती शाडूच्‍या मातीची करून शास्‍त्रसुसंगत गणेशोत्‍सव साजरा करणार्‍या नागपूरकरांचे अभिनंदन !

नाशिक येथे जलनिःस्‍सारणाचे २० वर्षांचे काम एका दिवसात मार्गी !

नागरिकांनी तक्रारी करण्‍यापूर्वीच महापालिकेच्‍या अधिकार्‍यांनी हे काम का पूर्ण केेले नाही ? कामात हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा करणार्‍या अधिकार्‍यांना बडतर्फ केले पाहिजे.

नागपूर येथील बुकी अनंत उपाख्‍य सोंटू जैन याचा जामीन अर्ज उच्‍च न्‍यायालयाने फेटाळला !

व्‍यावसायिक विक्रांत अग्रवाल यांची ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा बुकी (जुगारात पैज लावणारी व्‍यक्‍ती) अनंत उपाख्‍य सोंटू जैन याचा जामीन अर्ज मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाने २६ सप्‍टेंबर या दिवशी फेटाळला.

राजकारणी आणि संत यांच्यातील मूलभूत भेद !

‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतीय खेळांना प्रोत्‍साहन आवश्‍यक !

भारताने यापुढे क्रिकेटसारख्‍या पाश्‍चात्त्य खेळांना महत्त्व न देता भारतीय खेळांवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्‍यासाठी खेळाडूंना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍यास भारतही यापुढे प्रत्‍येक स्‍पर्धांमध्‍ये अधिक संख्‍येने पदांची लयलूट करतांना दिसेल, हे निश्‍चित !