३.२२ टक्के मूर्ती ‘पीओपी’च्या, तर ९६ टक्के शाडूच्या मातीच्या मूर्तींचे विसर्जन !
नागपूर – येथील महानगरपालिकेद्वारे शहरात विविध ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात शहरातील ७ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. महापालिकेद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जन टँकमध्ये आतापर्यंत एकूण ७ सहस्र १७७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्या मूर्तींमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (‘पीओपी’च्या) २३१ मूर्ती असून त्यांचे प्रमाण ३.२२ टक्के आहे, तर ६ सहस्र ९४६ मूर्ती शाडूच्या मातीच्या असून त्यांचे प्रमाण ९६.७८ टक्के एवढे आहे.
सौजन्य नागपूर एक्सपिरन
४ फुटांपर्यंतच्या मूर्ती शहर क्षेत्रामधील कृत्रिम विसर्जन टँकमध्ये, तर ४ फुटांपेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावामध्ये करण्यात आले.
संपादकीय भूमिकाश्री गणेशमूर्ती शाडूच्या मातीची करून शास्त्रसुसंगत गणेशोत्सव साजरा करणार्या नागपूरकरांचे अभिनंदन ! |