२ हवालदार निलंबित
वास्को, २३ सप्टेंबर (वार्ता.) – शस्त्रास्त्र कायद्याखाली पंजाब पोलिसांना हवा असलेल्या कश्मिर सिंग या आरोपीने दाबोली विमानतळ पोलीस ठाण्यातून पलायन केले आहे. या प्रकरणी ठाण्यातील २ हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे.
Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरुन वॉन्टेड आरोपी फरार; दोन पोलिस कॉन्स्टेबल निलंबित#Goanews #Marathinews #Crime #Wanted #Goapolice #DabolimAirport #Suspend #Punjabarmscase #accused #escaped #Dainikgomantakhttps://t.co/9Q5HuToeo6
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) September 23, 2023
यासंबंधी पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार कश्मीर सिंग हा दाबोली विमानतळावरून गोवा ते दुबई विमानात चढण्याचा प्रयत्न करत असतांना त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलाच्या (‘सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स’च्या) पोलिसांनी कह्यात घेतले आणि दाबोली पोलीस ठाण्यातील पोलिसांकडे सुपुर्द केले. हा आरोपी दाबोली येथील पोलीस कोठडीत असतांना स्वतःला बरे वाटत नाही, असे सांगून दोन वेळा स्वच्छतागृहात गेला. तिसर्या वेळी ‘स्वच्छतागृहात जातो’, असे सांगून त्याने तिथे असलेल्या १० फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले.