श्री गणेमूर्तीदान मोहिमेस तीव्र विरोध केल्याने भोर (पुणे) मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे मूर्तींचे वहात्या पाण्यात १०० टक्के विसर्जन !

भोर येथील निरामाता घाट

भोर (जिल्हा पुणे) – अंनिसचा बालेकिल्ला असलेला आणि जेथून मूर्तिदानाचा आरंभ झाला त्या भोरमधे गणेश भक्तांनी काही वर्षांपूर्वी श्री गणेशमूर्ती दान मोहिमेस तीव्र विरोध केल्याने येथे १०० टक्के वहात्या पाण्यातच विसर्जन होत आहे. यावर्षीही भाविकांनी मोठ्या उत्साहात राजवाडा येथील शनिघाट, भोलावडे येथील निरा-माई घाट आणि रामबाग येथील घाटावर पारंपरिक पद्धतीने वहात्या पाण्यातच भावपूर्णपणे बाप्पाचे विसर्जन केले. या ठिकाणी घरगुती गौरी आणि गणपति विसर्जनासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जनही वहात्या पाण्यातच केले जाते.

वैशिष्ट्यपूर्ण

१. बहुतांश मंडळांनी पारंपरिक ढोल, लेझीम पथकासहित श्री गणेशाची पालखीतून मिरवणूक आयोजित केली होती.

२. पाटबंधारे विभागाकडून निरा-देवघर धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले.

३. घाटावर नगरपालिका प्रशासनाकडून कर्मचारी आणि ‘भोईराज रेस्क्यू पथका’चे कार्यकर्ते व्यवस्था पहात होते.

४. पोलीस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संपादकीय भूमिका :

भोरचा आदर्श इतरही गावांनी घेऊन मूर्तीदान न करता श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यातच करून श्री गणेशाची कृपा संपादन करून घ्यावी !