पंतप्रधान मोदी यांच्या इंडोनेशिया येथील ‘आसियान-इंडिया परिषदे’च्या कार्यक्रम पत्रिकेवर ‘भारताचे पंतप्रधान’ असा उल्लेख !
काँग्रेसची टीका
(‘आसियान’ म्हणजे दक्षिण-पूर्व आशिया देशांची संघटना)
काँग्रेसची टीका
(‘आसियान’ म्हणजे दक्षिण-पूर्व आशिया देशांची संघटना)
श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी ढोलताशा पथकांकडून केवळ बेलबाग चौक, उंबर्या गणपति चौक आणि टिळक चौक या ३ चौकांतच अधिकाधिक ८ ते १० मिनिटांपर्यंत वादनाचे खेळ सादर केले जाणार आहेत. उर्वरित चौकांतून ही पथके वादन करतांनाच मार्गस्थ होणार आहेत.
‘भारताच्या राज्यघटनेत पालट करून ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’ हेच नाव ठेवावे’, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना केली.
कर्नाटक सरकारने राज्यातील अनेक पोलीस अधिकार्यांचे स्थानांतर केले असून भीमाशंकर गुळेद यांची बेळगावच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते वर्ष २०१२ चे कर्नाटकातील ‘आय.पी.एस्.’ अधिकारी आहेत. बेळगाव हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा असून तो संवेदनशील आहे.
‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
मुंबई आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) कडून विद्यापिठांना मराठीत भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने मुंबई आयआयटी समवेत सामंजस्य करारही केले आहेत.
गंगापूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार सतीश सोनी यांना मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गंगापूर तालुक्यातील प्रत्येक गावात ३ दिवस ‘साखळी उपोषण’ करण्यात येणार आहे.
मनकर्णिका कुंड खुले होण्यासाठी गेली अनेक वर्षे हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सातत्याने लढा दिला आहे. कुंडावर शौचालय बांधले होते आणि ते हटवून कुंड खुले करण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला अन् करत आहे.