(म्हणे) ‘भारतासमवेतचे संबंध स्थिर !’ – चीन

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

बीजिंग (चीन) – देहली येथे येत्या ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी ‘जी-२०’ देशांची परिषद होत आहे. भारत या परिषदेचा अध्यक्ष आहे. या परिषदेला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग उपस्थित रहाणार नसून चीनचे पंतप्रधान ली कियांग हे उपस्थित रहाणार आहेत. यावरून जागतिक स्तरावर विविध निष्कर्ष काढले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसारित केले आहे. यात म्हटले आहे की, भारताने शिखर परिषदेच्या यजमानपदाचे आम्ही नेहमीच स्वागत केले आहे. ती यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व सदस्यांसह काम करण्यास सिद्ध आहोत. भारत आणि चीन यांमधील संबंध स्थिर आहेत आणि आम्ही विविध स्तरांवर चर्चा चालू ठेवली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी शिखर परिषदेच्या भारत-चीन संबंधांच्या प्रभावाशी संबंधित प्रश्‍नावर सांगितले की, आम्हाला वाटते की, इतर सर्व सदस्यांप्रमाणेच भारत चीनला शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा करण्यास प्रवृत्त करील.

संपादकीय भूमिका

चीनच्या या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ? चीनची बोलणे आणि करणे यात नेहमीच भेद राहिलेला आहे !