उत्तराखंडमध्ये २ मुसलमानांनी बंधूंनी हिंदु धर्म स्वीकारला !

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यात अरमान आणि इस्माईल नावाच्या २ मुसलमान बंधूंनी ‘घर वापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली आहे. ३ सप्टेंबर या दिवशी दोघांनीही आर्य समाज मंदिरात वेदिक मंत्रोच्चारात हिंदु धर्म स्वीकारला. अरमान आणि इस्माईल यांची आई हिंदु होती. ‘माझ्या दोन्ही मुलांना मी कधीही मशिदीत पाठवले नाही’, असे त्यांच्या आईने सांगितले. ‘आम्ही जन्मापासून मनाने हिंदु आहोत. माझ्या दोन्ही बहिणींनीही हिंदु मुलांसोबत विवाह केला आहे’, असे अरमान याने सांगितले.

या वेळी हिंदु संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही भावांनी सनातन धर्मात प्रवेश केल्यानंतर आनंद व्यक्त केला. अरमान आणि इस्लाईल यांचे जहरीखाल भागात कपड्यांचे दुकान आहे. अरमान याने सांगितले, ‘माझ्या आईचे नाव सीतादेवी असून तिने ३० वर्षांपूर्वी माझ्या वडिलांशी म्हणजे शम्मी यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर ती २ मुले आणि २ मुली यांची आई झाली. त्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले. आईने कपडे विक्रीचा व्यवसाय करून आमचे पालनपोषण केले.’