नवी देहली – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्माला संपवण्याविषयी केलेल्या विधानावरून आणि त्यांच्या विधानाचे समर्थन केल्यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आला आहेत. अधिवक्ता हर्ष गुप्ता आणि रामसिंह लोधी यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून दोघांवर उत्तरप्रदेशातील रामपूर येथील सिव्हिल लायन्स पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि.च्या कलम २९५ अ (धार्मिक भावना भडकावण्यासाठी हेतूपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये करणे) आणि १५३ अ (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
सनातन पर विवादित बयान पड़ा भारी, उत्तर प्रदेश में स्टालिन और प्रियंक खरगे पर दर्ज हुआ केस#UdhayanidhiStalin #SanatanaDharma #ControversialStatement #FIRhttps://t.co/cecvpnPayA
— India TV (@indiatvnews) September 6, 2023
संपादकीय भूमिकायावर तात्काळ कारवाई होऊन उदयनिधी आणि खर्गे यांना कारागृहात डांबले पाहिजे ! |