मुख्यमंत्री इंग्लंडला जाऊन ‘वाघनखे प्रत्यार्पण’ करारावर स्वाक्षरी करणार !

याच वाघनखांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्याशी दगाफटका करणार्‍या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.

एस्.टी. कर्मचार्‍यांचे ११ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण !

राज्यशासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास १३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप करण्याची चेतावणी एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संघटनेने दिली आहे.

द्रविडविरोधी विचारसरणीवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीला पोलीस अनुमती नाकारू शकत नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला एकाच विचारसरणीचे पालन करण्यास भाग पाडणे शक्य नाही आणि एखाद्या व्यक्तीला एखाद्या विचारधारेविषयी तिचे मते मांडण्याचा नेहमीच अधिकार असतो.

मंत्रालयातील पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती प्रदर्शनाला शेकडो भाविकांची भेट !  

श्री गणेश कला केंद्राच्या मूर्ती संतांच्या मार्गदर्शनानुसार आणि अथर्वशीर्षातील श्री गणेशाच्या वर्णनानुसार सिद्ध करण्यात आल्या आहेत.

(म्हणे) ‘घोषणापत्रात गर्व करण्यासारखे काही नाही !’ – युक्रेन

जी-२० परिषदेच्या घोषणापत्रात युक्रेन युद्धामध्ये रशियाचा उल्लेख टाळल्याने  युक्रेनची टीका

फरीदाबाद (हरियाणा) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची धर्मांधांकडून हत्या, तर दुसरा घायाळ

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अशा हत्या होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !

‘आंतरराष्ट्रीय आर्थिक महामार्ग’ हा इतिहासातील सर्वांत मोठा प्रकल्प ! – इस्रायल

हा आर्थिक महामार्ग चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ योजनेला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले जात आहे.  

प्रयागराज येथील शिवमंदिरातून शिवलिंगाचीच चोरी !  

पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

मोरोक्कोमधील भूकंपातील मृतांची संख्या २ सहस्रांहून अधिक !

या भूकंपात मोरक्कोची मोठी हानी झाली आहे. हा भूकंप ६.८ ‘रिक्टर स्केल’ इतक्या तीव्रतेचा होता. 

मुदत संपल्यानंतर उपकरणे भंगरात काढावी लागणार !

केंद्रशासनाने घरगुती वापराच्या उपकरणांची निश्‍चित केली मुदत !
धुलाई यंत्र, शीतकपाट, लॅपटॉप, भ्रमणभाष, संगणक, दूरचित्रवाणी संच आदींचा समावेश !