रबात (मोरक्को) – आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असणार्या मोरक्को देशामध्ये ९ सप्टेंबला झालेल्या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ सहस्रांहून अधिक झाली आहे. यासह २ सहस्र ५९ लोक घायाळ झाले असून त्यांतील १ सहस्र ४०४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
#BreakingNow: ‘महाभूकंप’.. मलबा बना मोरक्को! भीषण विनाश.. अब सिर्फ तबाही के निशान! मोरक्को में भूकंप से 2 हजार से ज्यादा लोगों की मौत@NAINAYADAV_06 #MoroccoEarthquake #Earthquake pic.twitter.com/z9FgtVr8dl
— Times Now Navbharat (@TNNavbharat) September 10, 2023
या भूकंपात मोरक्कोची मोठी हानी झाली आहे. हा भूकंप ६.८ ‘रिक्टर स्केल’ इतक्या तीव्रतेचा होता.