गोवा : पोलीस अधिकार्‍यांच्या छळवणुकीला कंटाळून महिला पोलीस उपनिरीक्षकाची स्वेच्छानिवृत्ती

गोवा पोलीस दलातील अधिकार्‍यांची गैरवर्तणूक चालूच ! पोलीस प्रशिक्षणात साधनेद्वारे नैतिकता शिकवणे अत्यावश्यक !

आज ‘हिंदु धर्म संघटने’च्या वतीने ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रम ! 

कोल्हापुरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशन’च्या वतीने श्रावण मासाच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच ११ सप्टेंबरला ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील ४६ माध्यमिक शाळा अनुदानास अपात्र !

राज्यातील विनाअनुदानित माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासाठी गेल्या वर्षीच्या सुधारित निकषांनुसार प्रस्ताव मागवण्यात आले होते. या शाळांच्या प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील ४६ शाळा अनुदानास अपात्र ठरल्या आहेत.

वाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंद

भिवंडी येथील वाडा महामार्गावर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरून जातांना तोल जाऊन पडल्याने आकाश जाधव (वय २२ वर्षे) या तरुणाचा ३१ ॲागस्टला अपघात होऊन मृत्यू झाला होता.

रिक्शाचालकाकडून अपहरण करून महिलेवर अतीप्रसंगाचा प्रयत्न !

रिक्शाचालक प्रभाक पाटील (वय २२ वर्षे) आणि वैभव राजेश तरे (वय १९ वर्षे) यांनी महिलेला इच्छित स्थळी न सोडता ८ सप्टेंबरच्या रात्री १०.४५ वाजता तिचे अपहरण केले. तिला कोळेगावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन हत्याराचा धाक दाखवत तिच्यावर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

गोवा : दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाच्या हिंदु विद्यार्थ्यांसाठी मशीद दर्शन कार्यक्रम !

सरकारचे अनुदान घेणार्‍या शाळांना कोणत्याही धार्मिक कृतीमध्ये सहभागी होता येत नाही, असे असतांना हा उपक्रम कसा राबवण्यात येतो ? शाळा व्यवस्थापन असे कार्यक्रम राबवून काय साध्य करू इच्छिते ?

पाऊस न आल्यास दूधगंगा धरणातून पाणी सोडण्यात यावे ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्हापूर

या वर्षी पुरेसा पाऊस न आल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादन घेतले जात असून यामध्ये मका (मुरघास) घेतल्यास टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील गुरांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून चारा पुरवता येऊ शकेल.

पुणे येथील वाकड-बालेवाडी पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी जनहित याचिका प्रविष्ट !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी वर्ष २०१३ मध्ये या पुलाला संमती दिली होती. ३१ कोटी रुपये व्यय करून वर्ष २०१८-१९ मध्ये पूल बांधून पूर्ण झाला आहे

पुणे येथील लाचखोर वैद्यकीय अधिष्ठात्याची पालिका सेवेतून हकालपट्टी !

पुणे महापालिकेच्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया’चे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना १६ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांची आता महापालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

संस्कृत ऑलंपियाड परीक्षेत कु. मोक्षदा महेश देशपांडे हिला सुवर्णपदक !

‘संस्कृत प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर’ आणि शासकीय ज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या संस्कृत ऑलंपियाड २०२३ या परीक्षेत ९८ गुण मिळवून कु. मोक्षदाने सुवर्णपदक मिळवले आहे.