एस्.टी. कर्मचार्‍यांचे ११ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण !

महागाई भत्त्यात वाढ आणि ७ वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या (‘एस्.टी.’च्या) कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात आणखी ४ टक्के वाढ करावी, तसेच ७ वा वेतन आयोग लागू करावा, या मागण्यांसाठी एस्.टी. कर्मचार्‍यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली. ८ सप्टेंबरला राज्यशासनाने एस्.टी. कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के इतकी वाढ केली. त्यामुळे ३४ टक्के इतका असलेला महागाई भत्ता ३८ टक्के इतका झाला आहे. तो आणखी वाढवण्याची कर्मचार्‍यांची मागणी आहे.

राज्यशासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास १३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप करण्याची चेतावणी एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संघटनेने दिली आहे.