‘आंतरराष्ट्रीय आर्थिक महामार्ग’ हा इतिहासातील सर्वांत मोठा प्रकल्प ! – इस्रायल

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

जेरूसलेम् (इस्रायल) – भारतात आयोजित करण्यात आलेल्या ‘जी-२०’ परिषदेमध्ये भारत, मध्य-पूर्वेतील देश, युरोप आणि अमेरिका यांना रेल्वे, रस्ता अन् बंदर यांच्या माध्यमांतून जोडणार्‍या आर्थिक महामार्गाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर इस्रायलने आनंद व्यक्त करत याला ‘मोठी योजना’ असे म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून म्हटले की, या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे मुख्य केंद्र इस्रायल आहे; कारण तो आशियाला युरोपशी जोडणार आहे. या प्रकल्पामुळे मध्य-पूर्व आणि इस्रायल यांचा चेहरामोहरा पालटेल. संपूर्ण जगावर याचा परिणाम होणार आहे. इतिहासातील हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे.

भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, जर्मनी, इटली आदींनी याची घोषणा केली होती. हा आर्थिक महामार्ग चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ योजनेला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले जात आहे.