कॅनडातील हिंदू खलिस्तानी आतंकवादाच्या सावटाखाली आहेत ! – कॅनडातील हिंदु खासदार चंद्रा आर्या

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे जस्टिन ट्रुडो यांनी ‘तेथील हिंदु नागरिकांच्या संरक्षणासाठी ते काय करणार आहेत ?’, हे त्यांना सांगण्यासाठी भाग पाडले पाहिजे !

राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी असल्याने त्यांना संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे, हा सनातन धर्म आहे का ? – उदयनिधी स्टॅलिन

प्रत्येक गोष्टीला सनातन धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करणार्‍या उदयनिधी यांना सनातन धर्मद्वेषाची काविळ झाली आहे, असेच यातून दिसून येते !

एन्.आय.ए.ने कॅनडात लपलेल्या ४३ आतंकवादी आणि गुंड यांचा तपशील प्रसारित करून मागितली माहिती !

कॅनडा सरकारकडे या आतंकवाद्यांवर कारवाई करून भारतात सोपवण्याची मागणी करूनही ती नाकारण्यात आली आहे. यातून कॅनडाचे सरकार कशा प्रकारे आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहे, हे लक्षात येते !

कॅनडात पंजाबमधील शीख गुंडाची गोळ्या झाडून हत्या

कॅनडातील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडलेली आहे, हेच यातून लक्षात येते ! पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर आगपाखड करत रहाण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे !

भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा थांबवली !

कॅनडात झालेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात चालू झालेल्या वादातून आता भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याचे तात्पुरते थांबवण्यात आल्याची घोषणा केली आहे.

(म्हणे) ‘भारताच्या राजदूतांची हकालपट्टी करा, रा.स्व संघावर बंदी घाला !’ – कॅनडातील मुसलमान संघटना

अशा प्रकारच्या मागण्या करून कॅनडातील मुसलमान संघटना भारतद्वेषाचा कंड शमवून घेण्याचा प्रयत्न करत आहे !

सलमान खान आणि शाहरूख खान यांच्‍यावर श्री गणेशमूर्तीची स्‍थापना अन् आरती केल्‍यावरून टीका

अभिनेते सलमान खान यांची बहीण अर्पिता हिच्‍या घरी श्री गणेशाचे आगमन झाल्‍यावर तेे सहकुटुंब आरती करतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित झाला होता. त्‍यानंतर त्‍यांच्‍या धर्मबांधवांनी त्‍यांच्‍यावर सामाजिक माध्‍यमांतून ‘इस्‍लामला लागलेला कलंक’ अशा शब्‍दांत टीका केली.

शाळांमधून चालू असलेला इस्‍लामी प्रचार रोखा ! – जयेश थळी, सचिव, गोमंतक मंदिर महासंघ

विद्यालयामध्‍ये इस्‍लामी आतंकवाद पसरवून त्‍यांचे धर्मांतर करण्‍याचा हा प्रकार आहे ! गोव्‍यातील पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्‍या पाहिजेत अन्‍यथा या षड्‍यंंत्रात अजूनही विद्यार्थी फसण्‍याची शक्‍यता आहे. गोव्‍यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचे अन्‍वेषण करून विद्यार्थ्‍यांमध्‍ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्‍याचे षड्‍यंत्र रोखायला हवे.

अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले